इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकरीता १६ कोटीचा निधी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

- नीलकंठ मोहिते ३१ कामे मार्गी लागणार

 रेडा : इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठया प्रमाणात पुरामुळे नुकसान झाले होते.व रस्त्यांची दुरावस्था झालेली होती.त्यामुळे दळणवळण च्या दृष्टीने नागरिकांना गैरसोयीचे मोठ्या प्रमाणात होत होती,काही ठिकाणी रस्ते वाहून गेले होते, तर काही ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम भिगवण विभाग, व इंदापूर विभाग या दोन्ही विभागात मिळून ३१ कामांसाठी रु.१६ कोटी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या संदर्भात बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कि, इंदापूर तालुक्यातील पूरहानी झालेल्या भागाची मी पाहणी केली होती.त्यावेळी संबंधित यंत्रणेला तात्काळ व योग्य पध्दतीने पंचनामे करणेबाबत निर्देश दिले होते.त्याअनुषंगाने भिगवण विभागात रा.मा. ५४ भिगवण बारामती रस्ता ते मदनवाडी घाट लामजेवाडी रस्ता रु.१७.३८ लक्ष,भवानीनगर जाचकवस्ती काझड अकोले रस्ता रा.मा. ९ रस्ता रा.मा.क्र.१३२ ( जाचकवस्ती काझड भाग,वाहून गेलेला भरावासाठी ) रु.६९.५३ लक्ष, कळस – जंक्शन – वालचंदनगर रा.मा. १२४ ( कळस ते वालचंदनगर मोऱ्या वाहून गेलेला भराव, कळंबोली पुलाचे रोलिंग ) रु. ९७.३४ लक्ष असे एकूण ३ कामांसाठी रु.१८४.२५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच लाकडी -कळस रस्ता प्रजिमा ६५ ( मोन्यांची दुरुस्ती,रस्त्याचा खराब झालेला भाग करीता) रु.१९.७८ लक्ष, अंथुर्णे शेळगाव रस्ता प्रजिमा ७६ ( शेळगाव भागातील वाहून गेलेला भराव, मोऱ्याचे भराव करीता ) रु. ३४.९४ लक्ष, कळंब लासुर्णे रस्ता ( वाहून गेलेला भराव, मोर्या करीता) रु. २६.३७ लक्ष, भिगवण स्टेशन भिगवण ते रा.म.मा.९ रस्ता प्रजिमा ७९ ( मो्या दुरुस्ती व भराव दुरुस्ती) रु.१.९८ लक्ष, म्हसोबाची वाडी निरगुडे भादलवाडी डाळज नं.२ कुंभारगाव पोंदवडी शेटफळगडे रस्ता निरगुडे येथील वाहून गेलेल्या तळी पुलाच्या ठिकाणी छोटा पूल बांधणे, डाळज नं.२ येथील वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधणे रु.६१३.०० लक्ष, रणगाव शिरसटवाडी रस्ता ( मोऱ्यांची दुरुस्ती, भराव दुरुस्ती ) रु. १६.४८ लक्ष, कळस शेळगाव रस्ता (कळस शेळगावयेथील वाहून गेलेल्या मोर्यांचे भराव दुरुस्ती )रु.५.९३ लक्ष, खडकी पारवडी शेटफळगडे लाकडी भवानीनगर सणसर कुरवली रस्ता (कारखान्याजवळील खराब रस्ता दुरुस्ती करणे ) रु.४६.१५ लक्ष, म्हसोबाचीवाडी लाकडी काझड बोरी लासूण्ण रस्ता (वाहून गेलेले भराव दुरुस्ती करणे) रु.१९.७८ लक्ष, बोरी शेळगाव रस्ता (मोन्या दुरुस्ती व भराव दुरुस्ती करणे) रु. १३.१९ लक्ष, रा.मा. १२१ अंथुणे भरणेवाडी बिरंगुडवाडी रस्ता (मोऱ्यांची व भरावची दुरुस्ती करणे ) रु. ६.५९ लक्ष, रा.म.६५ ते पळसदेव माराव्दादी कळस बोरी रस्ता (भराव दुरुस्ती )रु. १३.१९ लक्ष असे एकूण १२ कामांसाठी रु. ८१८.२६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच इंदापूर विभागात श्रीराम चौक ते इजगुडे पंप रु.३१.२९ लक्ष, गणेशवाडी पूल व निरा नदीवरील पूल नरसिंहपूर रु.३४.७६, कॅनॉल मोऱ्या रेडणी ते खोरोची रु.१९.७८ लक्ष, सावंत वस्ती पूल रु.२८.३५ लक्ष,खोरोची गावाजवळचा पूल रु.७५.८१, कळाशी ते गंगावळण पूल रु. रु.२६.३७, राजेवाडी बँक वॉटरपूल रु.१६.४८ लक्ष, रेडा ते निरा भिमा ओढयावरील पूल रु.६२.६३ लक्ष, तरंगवाडी गोडाऊन जवळील पूल दुरुस्ती रु.२३.०७ लक्ष,अगोती नं.१ चांडगाव भराव दुरुस्ती १२७ – रु.४२.८५ लक्ष, अकलूज रस्ता ते शेटफळ हवेली पूल बांधणे रु.४६.१५ लक्ष, म्हेत्रे वस्तीजवळील पूल शिरसोडी ते इंदापूर रु.१३१.८५ लक्ष, सावंत वस्ती पूल रु.१७.५८ लक्ष, सावंतवस्ती भाटनिमगाव पूल रु.८.५७ लक्ष, पाणंद रस्ता दुरुस्ती निमगाव केतकी जवळ रु.१६.४८ लक्ष, खोरोची पूल व ३ मोऱ्या दुरुस्ती रु. १९.७८ लक्ष असे एकूण १६ कामांसाठी रु.६००.०० लक्ष निधी मंजूर करण्यात आला.

सदरची कामे तात्काळ सुरु करण्यात येणार असून संबंधित गावातील नागरिकांनी तसेच ग्रामपंचायतीने विशेष लक्ष देऊन दर्जेदार कामे करून घ्यावीत असे आवाहन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.