शहरात 15 जणांना डेंग्यूची लागण

पिंपरी – वातावरणात बदल होताच शहरात पुन्हा एकदा आजारांनी डोके वर काढले आहे. एकीकडे शहरात स्वच्छ सर्वेक्षण आणि त्यासाठी तयारी सुरु असतानाच डासांच्या प्रादुर्भावाने डेंग्यूंच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

शहरामध्ये जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत 15 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 216 रूग्ण हे संशयित असल्याचे आढळले. त्या पार्श्‍वभूमीवर, महापालिका आरोग्य विभागाकडून रविवारी (दि. 26) शहरात 13 हजार 47 घरांतील 54 हजार 155 कंटेनर (भांडी) तपासण्यात आले. त्यातील 137 भांड्यांमध्ये डास अळ्या आढळून आल्या.

शहरातील विविध रूग्णालयांमध्ये चालू महिन्यात 5 हजार 389 तापाचे रूग्ण आढळले आहेत. तसेच, 15 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे देखील निदर्शनास आले आहे. दरम्यान, याबाबत उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 94 भांडी रिकामी करण्यात आली. 43 भांड्यांमध्ये ऍबेट औषध टाकण्यात आले. तसेच, टायर, पंक्‍चर आणि भंगार मालाच्या 76 दुकानांची तपासणी करण्यात आली. 12 बांधकामे तपासली गेली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.