Kerala Doctor Suicide : केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. २६ वर्षीय शहानाने हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, मृत डॉक्टरचा भाऊ जसीम याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. जेव्हा कुटुंबीय हुंड्याची मागणी करू लागले तेव्हा तो बहिणीला अशा कुटुंबात लग्न करू नका असे सांगत होता, मात्र शहानाचा तिच्या प्रियकरावर विश्वास होता. मात्र, तिच्या प्रियकरासह कुटुंबीयांनी हुंड्यासाठी लग्न मोडल्याने तिचा विश्वास तुटला.
शहाना तिरुअनंतपुरमच्या सरकारी मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागातून पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती. या दरम्यान, तिची मैत्री डॉ. ई.ए. रुवैस यांच्याशी झाली, त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेम फुलल्यावर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शहानाने कधीही विचार केला नसेल की ती ज्याच्यावर मनापासून प्रेम करते, ती व्यक्ती त्यांचे आयुष्य एकत्र घालवण्यासाठी आणि दोघांच्या नात्याला पैशाने तेलात होती.
डॉ.शहाना ही आई आणि दोन भावंडांसोबत राहत होती. आखाती देशात काम करणाऱ्या त्याच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. शहानाचा भाऊ जसीमने आरोप केला आहे की, तिचा प्रियकर डॉ. रुवैसच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून 150 ग्रॅम सोने, 15 एकर जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती. डॉ.शहानाच्या कुटुंबीयांनी मागणी पूर्ण करू शकत नसल्याचे सांगताच, तिच्या प्रियकराच्या कुटुंबीयांनी लग्न रद्द केले. जसीम म्हणतो, “त्याने (रुवैस) शहानाच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं पण त्याने कुटुंबासह लग्न मोडलं. यामुळे बहीण पूर्णपणे तुटली आणि तिने आत्महत्या केली.”असा आरोप केला आहे.
पोलिसांनी प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर शहाना 5 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरममधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. तिथून एक सुसाईड नोट सापडली असून त्यात “प्रत्येकाला फक्त पैसे हवे आहेत.” असे लिहिले आहे.
या प्रकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की,”राज्याच्या महिला व बालविकास विभागाला हुंडा मागणीच्या आरोपांबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगही या प्रकरणात लक्ष घालत आहे. समितीचे अध्यक्ष ए.ए. रशीद यांनी जिल्हाधिकारी, शहर पोलिस आयुक्त आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांना १४ डिसेंबर रोजी आयोगासमोर हजर राहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पी.सतीदेवी यांनी शहाना यांच्या जवळच्या वेंजरामुडू येथील घरी जाऊन त्यांच्या आईचे सांत्वन केले. तरुण डॉक्टरच्या कथित आत्महत्येबद्दल दु:ख आणि चिंता व्यक्त करत सतीदेवी म्हणाल्या की, हुंड्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे तिला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले असेल, तर कठोर कारवाई व्हायला हवी. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.