RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने सलग पाचव्यांदा रेपो दर ६.५ टक्के राखला आहे. द्विमासिक पतधोरण आढावा सादर करताना RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, ‘जागतिक अनिश्चितता असूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, आपला पाया मजबूत आहे. तसेच, चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी आर्थिक विकास दराचा अंदाज 6.5 टक्क्यांवरून सात टक्के करण्यात आला आहे. त्याचवेळी किरकोळ महागाईचा अंदाज ५.४ टक्के राखण्यात आला आहे.’
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास पुढे म्हणाले, ‘मौद्रिक धोरण समितीने (MPC) महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अनुकूल भूमिका मागे घेण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे.’
घराचा EMI बदलणार नाहीच
– रेपो दर 6.5 टक्के राखण्याचा अर्थ असा आहे की घर आणि वाहनासह विविध कर्जावरील मासिक हप्त्यांमध्ये (ईएमआय) कोणताही बदल होणार नाही.
बुधवार (7 डिसेंबर 2023) पासून सुरू झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, ‘परिस्थिती लक्षात घेऊन, MPC मौद्रिक नीति समितिच्या सर्व सहा सदस्यांनी एकमत केले. तसेच रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जीएसटी संकलन, पीएमआय (परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स) यासारखे महत्त्वाचे आकडे मजबूत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर सात टक्के राहण्याचा अंदाज आहे. आरबीआयने यापूर्वी 2023-24 मध्ये विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. चालू आर्थिक वर्षात किरकोळ चलनवाढीचा दर ५.४ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.
रेपो दर म्हणजे काय ?
रेपो दर थेट बँकेकडून घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. RBI च्या आजच्या निर्णयानंतर EMI वर देखील परिणाम होणार आहे. रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI बँकांना कर्ज देण्याचे काम करते.