दिवसभरात आणखी 152 बाधित सापडले; 113 जणांना 24 तासांत डिस्चार्ज
पुणे – करोनामुळे गेल्या 24 तासांत आतापर्यंतचा सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्ह्यातील एक, तर शहरातील 13 जण आहेत.
मृतांमध्ये एक 44 वर्षीय व्यक्ती सोडला, तर अन्य सर्व मृत व्यक्तींचे वय 50 ते 80 वयोगटातील आहे. यातील बहुतांश व्यक्तींना जुन्या आजाराचा इतिहास होता. दीनानाथ रुग्णालयात 2, नगर रोडवरील सह्याद्री रुणालय, पूना हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल आणि वायसीएम रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात 152 करोना बाधित सापडले. तर 165 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत. बुधवारी विविध रुग्णालयांतून 113 जणांना डिस्चार्ज दिला. बाधितांची एकूण संख्या 3 हजार 899, तर घरी सुखरूप गेलेल्यांची संख्या 2 हजार 23 इतकी आहे. आतापर्यंत 221 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.