मुंबई – पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि प्रसिद्ध बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. नुसरतने केवळ अभिनयच नाही तर राजकारणातही स्वत:ला सिद्ध केले. बंगाली बाला नुसरत तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. आता नुसरतबद्दल बातमी आहे की ती लवकरच बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहे. सलमान खानने होस्ट केलेला वादग्रस्त रिअॅलिटी शो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित होणार असल्याची माहिती आहे.
नुसरत बिग बॉस 16 मध्ये दिसणार
रिपोर्ट्सनुसार, नुसरत सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये दिसणार आहे. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी नुसरत जहाँला अप्रोच केल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नाही तर रिअॅलिटी शोमध्ये दिसण्यासाठी तिला दर आठवड्याला 16 लाख रुपयांची ऑफरही देण्यात आली आहे. नुसरत जहाँ चित्रपट आणि राजकारणात खूप सक्रिय आहे. अशा परिस्थितीत नुसरत बिग बॉसचा भाग आहे की अफवा आहे की सत्य हे येणारा काळच समजेल. नुसरत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यशसोबतच्या नात्याबद्दल तिने आधी मौन बाळगले. पण आता ती उघडपणे याबाबत सांगते.
नुसरत जहाँ व्यतिरिक्त पूनम पांडे, राजीव सेन, चारू असोपा, फैसल शेख, जन्नत जुबैर आणि सुरभी ज्योती हे स्टार्स सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसू शकतात. बिग बॉस 16 चा प्रीमियर 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सीझनही सलमान खान होस्ट करणार आहे.