Samarth Jurel and Isha Malviya Breakup| ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनमध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल हे दोघेही स्पर्धक एकमेकांना डेट करत होते. या शोमुळे दोघेही प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मात्र एकमेकांना डेट केल्यानंतर आता ईशा आणि समर्थचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘बिग बॉस 17’चे हे स्पर्धक आता एकत्र नाहीत. समर्थ आणि ईशाचं ब्रेकअप झालं आहे. मात्र, समर्थाला याबाबत आत्ताच बोलायचे नाही. समर्थ आणि ईशाच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समजलेले नाही, परंतु यावर्षी होळीपर्यंत दोघांमध्ये सर्व काही ठीक होते. त्यानंतर काय झाले हे समजू शकलेले नाही,’ असे अभिनेत्याच्या मॅनेजरकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल एकत्र अंकिता-विकीच्या होळी पार्टीमध्ये सहभागी झाले होते. Samarth Jurel and Isha Malviya Breakup|
समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांची पहिली भेट ‘उदारियां’ शोच्या सेटवर झाली होती. या शोमध्ये अभिषेक कुमारही मुख्य भूमिकेत होता. समर्थच्या आधी ईशा अभिषेकला डेट करत होती. या दोघांनी बिग बॉस 17 च्या घरात एकत्र प्रवेश केला होता. नंतर समर्थने सलमान खानच्या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला आणि तो ईशाचा प्रियकर असल्याचे उघड केले. महिन्याभरापूर्वीच या जोडप्याचं ब्रेकअप झालं असून नुकतंच त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं आहे. यामुळे त्यांचे चाहते प्रचंड निराश झाले आहेत.
हेही वाचा: