सिंगापूर – सिंगापूरमध्ये सुमारे 13 हजार विदेशी कामकारांना त्यांच्या कामावर रुजू होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोविड-19 च्या ऑनलाईन तपासणीसाठी दर 15 दिवसांनंतर अनिवार्य तपासणी न केलेल्या कामगारांना यासाठी रोखले गेले आहे.
या कामगारांचा ‘ऍक्सेस कोड’ लाल रंगात दर्शवलेला असेल. त्यामुळे या कामगारांना कामावर रुजू होता येणार नाही, अन्य कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेयात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
कामगारांना 15 दिवसांनी ‘रोस्टर्ड रुटीन टेस्टींग’ (आरआरटी) करून घेण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत. त्यासाठीची मुदत 5 सप्टेंबर रोजी समाप्त झाली. ‘आरआरटी’ एकदा केल्यावर या कामगारांचा ‘ऍक्सेस कोड’ पुन्हा हिरव्या रंगात दिसेल आणि त्यांना कामावर रुजू होता येणार आहे.
सुरक्षिततेची उपाय योजना म्हणून विदेशी कामगारांना दर 14 दिवसांनी ही चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या विदेशी कामगारांमध्ये बहुसंख्य भारतीय कामगार आहेत. सिंगापूरमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या 57 हजारांच्या पुढे आहे.