नवी दिल्ली – देशात काल एका दिवसात करोनाच्या 12,847 नवीन केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. कोविडच्या देशातील केसेस मध्ये सध्या पुन्हा वाढ होऊ लागल्याचेच हे लक्षण मानले जात आहे. त्यामुळे देशातील कोविडच्या सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील 4,800 हून अधिक वाढ झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत कोविडमुळे 14 जण दगावले असून त्यामुळे एकूण मृतांची संख्या 5,24,817 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमणांपैकी सक्रिय प्रकरणे आता 0.15 टक्के आहेत, तर देशातील कोविड-19 रिकव्हरी रेट 98.64 टक्के नोंदवला गेला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान देशात आतापर्यंत कोविड लसीचे एकूण 195.84 डोस देण्यात आले आहेत.