नवी दिल्ली – दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध मनी लॉंड्रिंगच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडून दिल्ली आणि अन्य ठिकाणांवर आज पुन्हा छापे टाकण्यात आले.
जैन यांच्याशी संबंधीत किमान दहा ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. जैन यांची हवाला व्यवहाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.
एप्रिलमध्ये, ईडीने चौकशीचा एक भाग म्हणून जैन यांच्या कुटुंबाची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच जैन यांच्याशी संबंधीत एका व्यावसायिकाचीही मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.