मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘तापसी पन्नू’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, तसेच ‘क्वीन’ चित्रपटाचा निर्माता विकास बेहेल यांच्या घरावर आणि मालमत्तांवर आज (दि. ३) प्राप्तिकर विभागानं धाड टाकली आहे. सध्या पुणे आणि मुंबईत तब्ब्ल २२ ठिकाणांवर हे धाडसत्र सुरु आहे.
Income Tax raids underway at the properties of film director Anurag Kashyap and actor Taapsee Pannu in Mumbai: Income Tax Department
— ANI (@ANI) March 3, 2021
दरम्यान, कलाकारांच्या घरावर अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई २०१५ मध्ये आलेल्या फँटम चित्रपटाशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता या छापासत्रातून अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.