पुणे : सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर टोळीतील गुंडाच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओंकार कुडलेसह तीघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. टोळीती वर्चस्व वादातून हा प्रकार 23 जानेवारी रोजी नाना पेठेत घडला. यानंतर आंदेकर टोळीने बदला घेत ओंकारवर जीवघेणा हल्ला केला होता.
ओंकार कुडले, कानिफनाथ महापुरे आणी राजन काळभोर अशी अटक आरोपींची नावे आहेत. गोटया माने, शुभम पवळे, आकाश सासवडे(सर्व रा.डोके तालिम) यांच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी व त्याचे मित्र घराजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवर ट्रीपल सीट हातात कोयते घेऊन दाखल झाले. फिर्यादीला “तुला आज बघतोच तू सूरज ठोंबरेच्या टोळीच्या बातम्या आंदेकर टोळीला देऊन लावालाव करतोस. तुला आज संपवतोच, सुरजभाऊनी तुला संपवायला सांगितली आहे’. असे म्हणत कोयत्याने डोक्यावर वार केला. यानंतर आरोपींनी हवेत कोयते फिरवत भाईका राज आनेवाला है असे ओरडत नागरिकांवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक सैरावैरा पळाले होते. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते करत आहेत.
सुर्यकांत आंदेकर यांच्या टोळीमध्ये सुरज ठोंबरे कार्यरत होता. टोळीमध्ये काम करत असताना, आंदेकर व ठोंबरे यांच्यामध्ये काही वाद झाले. यानंतर ठोंबरेने आंदेकरची टोळी सोडून तीन ते चार वर्षापूर्वी स्वत:ची टोळी निर्माण केली. यानंतर आंदेकर आणी ठोंबरे टोळीमध्ये वर्चस्व वादातून स्पर्धा निर्माण झाली.