नागौर – देवदर्शनासाठी जात असताना ट्रक व क्रुझरच्या भीषण अपघात 11 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना राजस्थानमधील नागपूर येथे घडली आहे. बिकानेर-जोधपुर हायवेवर नोखा नागौर भागात असलेल्या श्री बालाजी गावाजवळ हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच श्री बालाजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Rajasthan | 11 people were killed after a cruiser collided with a truck in Nagaur today morning. 7 others were seriously injured and were shifted to a hospital in Nokha, Bikaner: SHO, Shri Balaji Police Station, Nagaur pic.twitter.com/7mXXMoUHyS
— ANI (@ANI) August 31, 2021
आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान हा अपघात झाला असून जखमींना जवळच्या रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. क्रुझरमध्ये जवळपास 17 प्रवासी प्रवास करत होते. सकाळच्या सुमारास या क्रुझरची आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रुझर गाडीचा संपूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
The horrific road accident in Nagaur, Rajasthan is very painful. I express my condolences to the families of all those who have lost their lives in this accident and wish the injured a speedy recovery: PM Narendra Modi pic.twitter.com/QD1Ucxbhcv
— ANI (@ANI) August 31, 2021
या अपघातात 8 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघा जखमी प्रवाशांनी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. जखमी झालेल्या प्रवाशांना नोखा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. अपघातग्रस्त प्रवासी हे मध्य प्रदेशातील सजनखेडाव दौलतपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते राजस्थानला देवदर्शनासाठी आले होते.
या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बिकानेर येथील अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.