एकूण रुग्णसंख्या 3203; तर एका बाधित वृद्धेचा मृत्यू
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील आणखी 106 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3203 झाली आहे. तर सातारा शहरातील एका बाधित वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 106 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर सातारा शहरातील रामाचा गोठ मंगळवार पेठेतील 76 वर्षीय महिलेचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
एका बाधिताचा मृत्यू
सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रामाचा गोट मंगळवार पेठेतील 76 वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा खासगी प्रयोगशाळेत अहवाल करोनाबाधित आला असल्याची माहिती डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.