बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सायबर छळाविरोधत एक अभियानाची सुरुवात केली आहे. तिने ‘#Fullstoptocyberbullying‘ अभियानात महाराष्ट्र पोलीस दलाचे विशेष महा निरीक्षक काम करणार आहेत. सोनाक्षीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, सायबर छळ रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मिशन जोश’मध्ये विशेष महानिरीक्षक प्रताप दीवाकर यांच्यासोबत मी काम करणार आहे.
याचा उद्देश जागरूकता आणणे आणि लोकांना ऑनलाइन छळ, ट्रोल आणि ट्रोलिंग पीडितांच्या मानसिक तणावावर माहिती देण्यात येणार आहे. सोनाक्षीने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यात तिने खोटे अकाउंट आणि तिच्या फोटोचा कसा दुरुपयोग करण्यात तिला ट्रोल केले. ती म्हणाली, आज अनेक जण ट्रोलचे शिकार झाले आहेत आणि त्यापैकी मी एक आहे. आता या विरोधात मी लढाई सुरू केली असून ऑनलाइन ट्रोलिंग पूर्णपणे रोखणार आहे.
दरम्यान, जून महिन्यात सोनाक्षीने आपले ट्विटर अकाउंट डिएक्टिव केले होते, जेणेकरून ती नकारात्मकमतेपासून दूर राहू शकेल. तसेच इंस्टाग्रामवर टिप्पणी करण्याचा विकल्पही तिने बंद केला होता. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, सोनाक्षी लवकरच “भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे.
यात तिच्यासोबत अजय देवगन, संजय दत्त, नोरा फतेही आणि शरद केलकर मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 1971मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावर आधारित आहे.