लासुर्णे, दि. 12 (वार्ताहर) – जंक्शन (ता. इंदापूर) येथील 5 बाधितांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, तीन युवकांचा समावेश आहे. या बाधितांनी करोनावर मात केली असली तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
जंक्शन परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले.