जेरुसलेम – जेरुसलेममधील एका बस स्थानकाजवळ आज दोन बॉम्बस्फोट झाले. (1 killed, 14 injured after twin blasts near bus stop shake Jerusalem) त्यामध्ये एक ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. पॅलेस्टाईनींकडून हा हल्ला करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पहिला स्फोट शहराच्या एका टोकाला असलेल्या बस स्थानकाजवळ झाला. या स्थानकाजवळ प्रवासी बसची वाट बघत थांबलेले असतात. तर दुसरा स्फोट शहराच्या उत्तरेकडील रामोत भागात झाला. या स्फोटामध्ये चार जण गंभीर जखमी झाले, असे इस्रायलच्या बचाव पथकाच्या अधिकारी मेगन डेव्हिड ऍडम यांनी सागितले.
काही दिवसांपूर्वी इस्रायली नागरिकांवरील हल्ल्याशी संबंधित तपासासाठी इस्रायली तपास संस्थांनी वेस्ट बॅंक भागामध्ये छापे घातले होते. त्यामुळे अलिकडेच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये तणाव वाढला आहे. पॅलेस्टाईनींच्या हल्ल्यांमध्ये अलीकडेच मोठी वाढ झाली आहे. पॅलेटिनींनी भोसकाभोसकी, कारचे अपघात आणि गोळीबारासारखे हल्ले केले आहेत. इस्लामिक दहशतवादी हमासकडून काही दिवसांपूर्वी आत्मघातकी स्फोट केले गेले होते. आजचे स्फोट घडवणारयांचे हमासने कौतुक केले आहे. मात्र या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
चुकीला माफी नाही! सौदी अरेबियात 10 दिवसात 12 लोकांचा शिरच्छेद; तीन पाकिस्तानी लोकांचा समावेश
इस्रायलच्या पंतप्रधानपदी निवड झालेले कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते बेन्जामिन नेत्यान्याहू यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच हे स्फोट झाले आहेत. हे दोन्ही स्फोट गर्दीच्या वेळी झाले आहेत. स्फोटामुळे रस्त्यावरील वाहने आणि जवळच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे.