भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच टी-२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताने १-० अशा फरकाने बाजी मारली. पहिला सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने सूर्यकुमारच्या जबरदस्त शतकीय खेळीमुळे ६५ धावांनी विजय मिळवला. तर तिसऱ्या सामन्यात एका डावानंतर पावसाने थैमान घातल्याने तो सामना अनिर्णित राहिला. या मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळलेल्या शतकीय खेळीची चर्चा सगळीकडेच झाली. कारण त्याच्या या खेळीबद्दल अनेकांनी त्याचे कौतुक केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनेही सूर्यकुमार यादवच्या त्या शतकीय खेळीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संघर्ष! बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, आता ‘ती’ खेळणार थेट देशासाठी क्रिकेट
मॅक्सवेलने सूर्यकुमार यादवांच्या शतकानंतर त्याची काय प्रतिक्रिया होती, याबाबत सांगितले. द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की,”मला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होतोय हे माहित नव्हते पण मी नंतर या सामन्याचे स्कोअरकार्ड पाहिले. मी ते पाहिल्यानंतर लगेच अॅरॉन फिंचला त्याच्या स्क्रिनशॉट पाठवला आणि म्हणालो हा खेळाडू नेमकं काय करत आहे? तो पूर्णपणे वेगळ्या ग्रहावर फलंदाजी करत असल्याचा भास होतो. इतर फलंदाजांची धावसंख्या पहा आणि सूर्यकुमारची धावसंख्या पहा. त्याने ५० चेंडूत १११ धावा केल्या होत्या. मी दुसऱ्या दिवशी त्या सामन्याचा रिप्ले पाहिला आणि मला विचित्र वाटले की तो बाकीच्या फलंदाजांपेक्षा किती सरस खेळला होता. सूर्यकुमार यादव खूपच पुढच्या लेव्हलचे क्रिकेट खेळात आहे.”
संघर्ष! बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, आता ‘ती’ खेळणार थेट देशासाठी क्रिकेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने जबरदस्त स्फोटक खेळी खेळली. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १११ धावांची तुफानी खेळी केली होती. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ७ षटकार फाटकावले होते. सूर्यकुमार यादवला त्याच्या अनोख्या शॉट्ससाठी ३६० डिग्रीचा खेळाडू म्हटले जात आहे. आगोदर अशा प्रकारचे शॉट्स फक्त एबी डिव्हिलियर्स खेळायचा. सूर्यकुमारने यंदाच्या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये २ शतके झळकावली आहेत.