Udayanraje Bhosale । Devendra Fadnavis । Lok Sabha Election 2024 : राज्यातील ज्या काही तीन चार मतदारसंघांवरून महायुतीचं घोडं अडलंय, त्यापैकी एक म्हणजे सातारा. सातारा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उदयनराजेंनी तीन दिवस दिल्लीत तळ ठोकलाय. पण अद्याप त्यांच्या हाताला काही लागत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता उदयनराजेंचे टेन्शन वाढले आहे.
मात्र, अश्यातच स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. । Udayanraje Bhosale । Devendra Fadnavis । Amit Shah
फडणवीस म्हणाले की, “उदयन महाराजांची भेट आज गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आज होईल. ते त्यांचं मत गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडतील. त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे, तो गृहमंत्री अमित शाह घेतील..”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. Amit Shah । Udayanraje Bhosale
“उदयनराजे 3 दिवस दिल्लीत बसून, मात्र अमित शहा त्यांना…”; रोहित पवारांचा खोचक शब्दात टोला
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उदयनराजे भोसले यांना खोचक टोला लगावला असल्याचं दिसून आलं आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “भाजपचा एकही खासदार नाही ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला नाही. मराठी माणूस स्वाभिमानी असतो तो दिल्ली पुढे झुकत नाही.
बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा मातोश्रीवर तिकीट वाटप केले जायचे आता परिस्थिती वेगळी आहे. उदयनराजे यांना दोन ते दिन दिवस वेळ दिला जात नाहीत. मात्र एक खासदार असलेल्या पक्षाला वेळ दिला जातो.
तुम्ही आमचे नेते घेऊ शकता, मात्र आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातील जनता विकत घेऊ शकत नाहीत. देशाला दाखवून द्यायचे आहे, त्यामुळे भाजपच्या प्रतिगामी विचाराला जिंकू देणार नाही”. असं रोहित पवार यावेळी म्हणाले.