मुंबई – देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकीने बलेनो आणि वॅगनआर मॉडेल्सची 16,000 हून अधिक वाहने परत मागवली आहेत. इंधन पंप मोटरच्या एका भागामध्ये संभाव्य दोष दूर करण्यासाठी ही वाहने परत मागवत आहोत, अशी माहिती मारुती सुझुकी इंडियाने शुक्रवारी दिली. (Maruti Suzuki recalls over 16,000 cars)
30 जुलै 2019 ते 1 नोव्हेंबर 2019 दरम्यान निर्मित 11,851 बलेनो वाहने आणि 4,190 वॅगनआर वाहने परत मागवण्यात येत आहेत. या वाहनांच्या इंधन पंप मोटरच्या एका भागामध्ये संभाव्य दोष असल्याचा संशय कंपनीने व्यक्त केला आहे. यामुळे क्वचित प्रसंगी इंजिन थांबू शकते किंवा इंजिन सुरू करण्यात समस्या निर्माण होऊ शकते, प्रभावित वाहन मालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपद्वारे भाग बदलण्यासाठी संपर्क साधला जाईल, अशी माहिती मारुती सुझुकीने दिली.
दरम्यान, अलीकडच्या काळातील मारुतीचा हा सर्वात मोठे रिकॉल आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये, मारुतीने एस-प्रेसो आणि इको मॉडेलची 87,599 वाहने परत मागवली होती. या वाहनांच्या स्टेअरिंग टाय रॉडमध्ये दोष होता.