Mahayuti Seat Sharing | Lok Sabha Election 2024 : भाजपने महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला तरी अद्याप महायुतीच्या अंतिम जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परंतु, आता येत्या 24 तासांमध्ये महायुतीचे जागावाटप मार्गी लागण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच महायुतीच्या जागावाटपाच्यादृष्टीने दिल्लीत निर्णायक बैठक पार पडली होती. अमित शाह यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत भाजप जास्त जागा लढवेल असे स्पष्ट सांगितले होते. अजित पवार गट आणि शिंदे गटापेक्षा भाजपच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. । Mahayuti Seat Sharing | Lok Sabha Election 2024
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे जिंकून येऊ शकणाऱ्या नेत्यालाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आहे. मात्र, आता महायुतीच्या अंतिम जागावाटपाचा तिढा सुटण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडत आहे. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातील. विशेष म्हणजे महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली.
या बैठकीत अजित पवार यांनी 7 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोली या सात जागांसाठी अजित पवार आग्रही आहेत. पण साताऱ्याची जागा भाजपला हवी आहे.
कारण भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसेल यांना साताऱ्याच्या जागेवर निवडणूक लढायची इच्छा आहे. उदयनराजे यांची इच्छा पाहता अजित पवार यांनी त्यांना घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्या हक्काच्या जागांसाठी आग्रही आहेत. शिंदे यांना 16 जागा हव्या आहेत. त्यामुळे अंतिम तोडगा कसा निघणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. । Mahayuti Seat Sharing | Lok Sabha Election 2024