पिंपरी – मावळातील चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. ते 43 हजार 979 मतांनी आघाडीवर आहेत.
श्रीरंग बारणे यांना 145087, पार्थ पवार यांना 101108, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 11495 मते मिळाली आहेत. 3264 मते नोटाला मिळाली आहेत.
श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा आपले नशिब आजमावत आहेत. तर बारणे यांच्या विजयामुळे शिवसेनेला मावळात विजयी हॅटट्रीक साधता येणार आहे. पार्थ पवार यांच्यामुळे पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारणे यांची आघाडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.