शशी थरूर तिरुवनंतपुरम मतदारसंघातून आघाडीवर

नवी दिल्ली – तिरुवनंतपुरम येथील उमेदवार शशी थरूर यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, ५४२ पैकी ४२७ जागांवरील कल हाती आले असून या आकडेवारीनुसार भाजपा २४० जागांवर आघाडीवर, काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर तर बहुजन समाज पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान काँग्रेसचे केरळमधील तिरुवनंतपुरम येथील उमेदवार शशी थरूर यांनी सुरुवातीच्या फेरीमध्ये आघाडी घेतली असून ते 34897 मतांसह आघाडीवर आहेत त्यांच्या पाठोपाठ 31164 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजाशेखरण आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.