देशभरात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात बॉलीवूडमधील स्टार्सनेही खास अंदाजात सेलिब्रेशन केले. यानिमित्त अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती आपला मुलगा विआनसोबत दहीहंडी फोडताना दिसते. यात शिल्पाचे पती राज कुंद्राही दिसतात.
शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर कायम ऍटिव्ह राहत आपल्या जीवनातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असती. शिल्पाने दरवर्षी प्रमाणे यंदाही जन्माष्टमी जल्लोषात साजरी केली. यावर्षी तिने पती राज कुंद्रा आणि मुलगा विआनसोबत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. याचा एक व्हिडिओ शिल्पाने शेअर केला असून त्याचा अनेक जणांचे लाईक्स् मिळत आहे.
शिल्पाशिवाय बॉलिवुडमधील स्टार शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगन आणि अर्जुन कपूर यांनीही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
दरम्यान, शिल्पा शेट्टी 13 वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वापसी करत आहे. ती आपल्या आगामी “निकम्मा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साबिर खान यांनी केले असून अभिनेता अभिमन्यु दसानी काम करत आहे.