माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. सध्या सुश्मिता तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवित आहे. चित्रपटांपासून दूर असलेली सुश्मिता सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती तिच्या लाइफबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. त्यातच सध्याच्या लॉकडाउनच्या काळात तिने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर “लव्ह स्टोरी’ शेअर केली आहे.
सुश्मिता सध्या तिचा लॉकडाऊनचा काळ तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि तिच्या दोन मुलींसोबत स्पेंड करत आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तिच्या मुली एलिजा आणि ऋने पियानोवर काही ट्यून्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. सुश्मिताने तिच्या मुलींचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “माझी लव्ह स्टोरी, I Love You Guys’
या व्हिडीओमध्ये सुश्मिताची मुलगी एलिजाला ऋनेला मार्गदर्शन करताना दिसत आहे. सुश्मिताचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वी सुश्मिता तिच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. तिने तिच्या स्पोर्ट बाइकवर पोज देतानाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात ती ब्लॅक कलरच्या आऊटफिट्समध्ये दिसली होती.