कर्नाटकमध्ये घडली धक्कादायक घटना
बंगळुरू : गोल्ला (यादव) समाजबहुल भागात भारतीय जनता पार्टीच्या दलित खासदाराला प्रवेश नाकारण्यात आला असल्याची कर्नाटकमधील तुमाकावरु जिल्ह्यातील पमनहल्ली गावातेल एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून हे प्रकरण सोमवारी घडल्याचे बोलले जात आहे.
चित्रदुर्गाचे खासदार ए नारायणस्वामी हे आपल्या मतदारसंघातील पमनहल्ली गावात गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी काही विकास कामांसाठी चर्चासुरू असताना गोल्ला समाजातील काही स्थानिकांनी त्या ठिकाणी येत खासदारांसोबत वाद घालत सदर ठिकाणी दलित व्यक्तीस प्रवेश देणे हे त्यांच्या समाजातील चाली रितींच्या विरोधात असल्याचे सांगत प्रवेश नाकारला.
यानंतर कर्नाटक सरकारमधील उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्थानिक तहसीलदार, समाज कल्याण विभागातील कर्मचारी आणि पोलिसांना सदर गावाला भेट देऊन खासदारांना प्रवेश नाकारल्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.