वेब सीरीज “लस्ट स्टोरीज’मध्ये अभिनेत्री कियारा आडवाणीने दमदार भूमिका साकारत दर्शकांमध्ये सनसनी माजवून दिली होती. या हिंदी वेबसीरिजला खूपच पॉप्युलॅरिटी मिळाल्यानंतर ती आता तेलुगु भाषेत साकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यात श्रुती हसन ही कियारा आडवाणीने साकारलेल्या भूमिकेत झळकणार आहे.
या वेबसीरिजमध्ये श्रुती अशा एका पत्नीची भूमिका साकारणार आहे, जी आपल्या पतीसोबत रोमांस करून संतुष्ट होत नाही. या ऍपिसोडचे शूटिंगही पूर्ण झाल्याचे समजते आणि श्रुतीने यात खूपच जबरदस्त परफॉर्मेंस दिला आहे.
या वेबसीरिजची सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू आहे. डायरेक्टर संकल्प रेड्डी, तरुण भास्कर आणि नंदिनी रेड्डी तेलुगु लस्ट स्टोरीजच्या अनेक ऍपिसोड्सचे दिग्दर्शन करत आहेत. दुसरीकडे चित्रपटसृष्टीपासून दीर्घ काळापासून लांब असलेल्या श्रुतीने क्रॅक हा चित्रपटातून वापसी केली आहे. यानंतर ती आता लस्ट स्टोरीजमधून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे.