धक्कादायक! पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही

नवी दिल्ली –  उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा( बुधवारी दि . ३० सप्टेंबर ) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यातच  हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पीडितेचं शवविच्छेदन केलं.

या अहवालानुसार, “या तरुणीचा मृत्यू 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी झाला होता. पीडितेचा मृत्यू मानेचं हाड मोडल्याने झाला आहे. तसंच गळ्यावर जखमांचे निशाण आहे. पीडितेला ब्लड इन्फेक्शन झालं आणि हार्ट अटॅकही आला होता, असं अहवालात नमूद केलं आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. त्यामुळे  उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापल आहे .

दरम्यान या प्रकरणी FSL (फोर्स्ड सेक्शुअल इंटरकोस) चा अहवाल आज संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. वारंवार गळा दाबल्याने मणका मोडला, हेच तिच्या मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

पीडितेचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही. परिणामी या अहवालाचा थेट फायदा स्वाभाविकपणे आरोपींना होणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी अखेरचं एकदा मृतदेह पाहण्याची विनंती करुनही बळजबरीने अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे.

चौकशीसाठी विशेष पथक
हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

या समितीत गृह खात्याचे सचिव भगवान स्वरूप, पोलीस उपनिरीक्षक चंद्रप्रकाश आणि सशस्त्र पोलीस दलाच्या कमांडर पूनम यांचा समावेश या समितीत आहे. या समितीने आपला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे. या आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.