आज महाजनादेश यात्रा : भाजपकडून जय्यत तयारी
उरुळी कांचन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवार दि. 14 रोजी उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात पीएमटी बस स्टॉप शेजारी येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे विविध विकासकामांची माहिती देणार आहेत, अशी माहिती हवेलीचे भाजपाचे अध्यक्ष रोहिदास उंड्रे यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचे आगमन तळवाडी चौक तसेच एलाईट चौकात 3 वाजता होणार आहे, अशी माहिती शिरूर- हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली. पाचर्णे आणि उंड्रे म्हणाले की, उरुळी कांचन ते जेजुरी राज्य मार्ग मंजुरी, धनगर समाजाला शिफारसी लागू केल्याबद्दल तसेच कर्जमाफीचा निर्णय, पंतप्रधान किसान योजना, घरपोच गॅस सिलिंडर पेन्शन योजना, अपघात विमा योजना, अपंग- विधवासह योजना, 1825 रुग्णांना मदत, संभाजी महाराज समाधीचा विकास, पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोरेगाव मूळ येथील उपकेंदाला मंजुरी, लोणीकंद येथील क्रिडा संकुल, डॉ शामा प्रसाद मुखर्जी रूबवन योजनेत 211 कोटी, रिंगरोडला मंजुरी, आदीविषयी माहिती देणार आहेत.
यावेळी भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, उपाध्यक्ष गणेश कुटे, उपाध्यक्ष दादा सातव पाटील, राहुल पाचर्णे, विकास जगताप, अजिंक्य कांचन, पूनम चौधरी, चितरंजन गायकवाड, विकास चौधरी यांसह उरुळी कांचन, सोरतापवाडी, वळती, शिंदवणे, खामगाव, भवरापूर, कोरेगाव मूळ, पेठ, नायगाव, कुंजीरवाडी, तरडे, लोणी काळभोर भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख कमलेश काळभोर यांनी दिली. महाजनादेश यात्रेत शिरुर व हवेली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राहुल पाचर्णे यांनी केले आहे.