गराडे, (वार्ताहर) – चांबळी (ता. खेड) येथील चैत्री उत्सव यात्रा मंगळवारी (दि. 30 एप्रिल) व बुधवारी (दि. 1) उत्साहात पार पडला. यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती पुरंदर केसरी ऋतिक मुळीक विरुद्ध पुरंदर उपकेसरी बाळा जगदाळे यांची लावण्यात आली ही लढत बरोबरीत सुटली, त्यामुळे बक्षीस वाटून देण्यात आले.
चांबळी येर्थील चैत्री उत्सवास मंगळवारी पहाटे 5 वाजता भैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी उत्सव मूर्तीस अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिरातील मूर्ती व मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. पूजेनंतर दुपारी 12.15 ते सायंकाळी 5 वाजता देवांना ग्रामस्थांचे वैयक्तिक नाथास हार अर्पण तसेच रात्री 10 ते सकाळी 7 वाजता नाथांची मिरवणूक व छबिण्यांची हजेरी, ढोल लेझीम स्पर्धा उत्साहात साजरी झाली.
त्यानंतर सायंकाळी पालखीची ग्रामप्रदक्षिणा झाली. बुधवारी सकाळी 11 वाजता सविताराणी पुणेकर लोकनाट्य तमाशाचे आयोजन करून दुपारी 3 वाजता भैरवनाथ कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यांत आले होते. या कुस्ती आखाड्यात राज्यातील विविध भागातील 130 मल्लांनी हजेरी लावली तर या आखाड्यात महिला खेळाडूंनी हजेरी लावली होती.
पंच म्हणून वामन कामठे, रघुनाथ कामठे, मधुसूदन शेंडकर, कल्याण कामठे, संतोष कटके, शहाजी कामठे, शिरीष कामठे, विलास कामठे, शुभम कामठे यांनी काम पाहिले. तर कुस्त्यांचे निवेदन मारुती कामठे, मारुती शेंडकर उत्सवात हिशोबाचे काम पोपट शेंडकर यांनी पाहिले.
यावेळी माजी उपसरपंच संजय कामठे, पोपट शेंडकर, राहुल कामठे, पोलीस पाटील विश्वनाथ शेंडकर, जी. एस. शेंडकर, नाना शेंडकर, जगन्नाथ शेंडकर, गोपाळ कामठे, शिवराम शेंडकर, दिलीप कामठे, प्रसाद कामठे, श्रीरंग कामठे, हनुमंत कामठे, माऊली कामठे, नामदेव कामठे, गोरख शेंडकर आदी उपस्थित होते