अवसरी, (वार्ताहर) – अवसरी बुद्रुक येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीत एकूण 134 बैलगाडे धावले. विजेता बैलगाडा मालकांना एकूण 2 लाख 51 हजार रुपये विभागून देण्यात आले. तर लक्ष्मण बाबुराव काळे व शौर्य अमोल वाघ (सेकंद 11.31) यांच्या बैलगाड्याने घाटाचा राजा बहुमान मिळवला असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.
प्रथम क्रमांकात पहिला आलेला गाडा खंडू केशव वीर व नयन दीपक वळसे जुगलबंदी, द्वितीय क्रमांकात पहिला रुद्र तुषार टेमगिरे, तृतीय क्रमांकात पहिला तुकाराम संजय पाचुंदकर आणि पोखरकर जुगलबंदी, चतुर्थ क्रमांकात पहिला अक्षय बाळासाहेब टाव्हरे यांचे बैलगाडे फळीफोडचे मानकरी ठरले.
फायनलमध्ये प्रथम क्रमांक- विठ्ठल हरिश्चंद्र ढोमे, नयन दीपक वळसे, खंडू लक्ष्मण वीर (11.73), द्वितीय क्रमांक गुलाब केशव ढोबळे (12.07), तृतीय क्रमांक – ओमसाई बैलगाडा संघटना (12.12) तर आकर्षक बारीचे बक्षीस मारुती महादू मुटके यांच्या बैलगाड्याने मिळवले. 20 फुटांवरून झालेल्या बारीचे बक्षीस भगवान दगडु वायाळ यांच्या बैलगाड्याने मिळवले.
बैलगाडा शर्यतीचे नियोजन उपसरपंच अनिल हिंगे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण हिंगे, अजित चव्हाण, श्रीहरी हिंगे, संजय हिंगे, किशोर हिंगे, विराज हिंगे, सुनील हिंगे पाटील, सर्जेराव हिंगे पाटील, सचिन हिंगे, गुलाबराव हिंगे, संचालक शांताराम बापु हिंगे, अशोक हिंगे, विकास हिंगे, जयसिंग हिंगे, ऊत्तम शिंदे व यात्रा उत्सव समितीने केले.