स्व. नारायणरावजी पवारांच्या पुतळ्याचे आज आनावरण

राजगुरूनगर- खेड तालुक्‍याच्या हरितक्रांतीचे जनक माजी आमदार स्वर्गीय नारायणरावजी पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वडगाव घेनंद येथे रविवार (दि. 28) सकाळी नऊ वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्‍यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऋषिकेश पवार यांनी केले आहे.

खेड तालुक्‍याचे भाग्यविधाते आणि तालुक्‍याच्या हरितक्रांतीचे जनक स्वर्गीय नारायणराव (आप्पा) पवार यांनी खेड तालुक्‍याच्या इतिहासात सर्वाधिक काळ (सलग 20 वर्षे) आमदार म्हणून काम करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवले. जनतेच्या मनात आदरयुक्‍त स्थान मिळवले. त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यासह तालुक्‍यातील नेते उपस्थित राहणार आहेत
गेल्या दोन दिवसांपासून या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे.

पाऊस येतोय, जातोय म्हणून या कार्यक्रमाच्या ठिकाणी जनतेसाठी उत्तम नियोजन केले आहे. अर्धा ते एक एकर जागेमध्ये पत्र्याचे शेड करून कुठल्याही प्रकारची कार्यक्रमाला बाधा येणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून स्व. नारायणराव पवार यांचा खेड तालुक्‍यात पुतळा बसविण्याचे स्वप्न होते ते पुर्णत्वास आले असून या सोनेरी क्षणाचे तालुक्‍यातील जनतेने साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ऋषिकेश पवार यांनी केले आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)