महालक्ष्मी एक्सप्रेस: 17 तासांच्या थरारानंतर सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

मुंबई – मुंबई परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी साचल्याने अनेक रेल्वे स्थानकातील रूळ जलमय झाले त्यामुळे रेल्वे तसेच लोकल सेवेला चांगलाच फटका बसला.

दरम्यान, काल रात्री 8:30 वाजता मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’च्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले. त्यामुळे ही रेल्वे स्थानकातच थांबविण्यात आली. या रेल्वेत तब्ब्ल 2000 प्रवाशी अडकले होते. त्यानंतर तब्बल 17 तासांच्या अथक परिश्रमा मुळे सर्व प्रवाशांना सुरक्षित रेल्वेतून भाहेर काढण्यात आले.

मात्र, पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण येत होता. त्यामुळे तात्काळ मुंबईतून 50 जणांची टीम एकूण 6 बोटीच्या सहाय्याने बचावकार्यात सहभागी झाली आणि पुण्यातून ही 40 जणांची टीम आणखी 5 बोटींसह बचावकार्य करण्यासाठी दाखल झाले. तसेच, याठिकाणी प्रवाशांना वाचवण्यासाठी नेव्हीचे ‘सी किंग हेलीकॉप्टर’ देखील घटनास्थळी पोहचलं. आणि सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केली.

रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेसाठी 37 डॉक्टर्स आणि अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या. तसेच 14 बस आणि 3 टेम्पोच्या सहाय्याने प्रवाशांना सह्याद्री मंगल कार्यालय येथे पाठविण्यात आले आणि या ठिकाणी त्यांच्या जेवणाची आणि दैद्यकीय तपासणीची देखील व्यवस्था करण्यात आली.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)