सामूहिक बलात्कार प्रकरणी नाशिकचे दोन पोलीस निलंबित; विश्वास नांगरे पाटील यांची कारवाई

नाशिक – सामूहिक बलात्कार प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त ‘विश्वास नांगरे पाटील’ यांनी निलंबित केले आहे. कारभारी काकुळते आणि गोरख रेहरे अशी निलंबित पोलिसांची नावे आहे.

31 मे’च्या मध्यरात्री रिक्षाचालकाने त्याच्या मित्राच्या मदतीने एका विवाहितेला तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, अशी धमकी देत तिला बळजबरी रिक्षात बसवून घेऊन गेले. पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड आणि मखमलाबाद परिसरात तिच्यावर या दोघांनी अत्याचार केले होते.

सदरील घटनेप्रकरणी संशयित आरोपी महिलेला घटनास्थळावर घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या या दोन पोलिसांनी हा प्रकार बघून विचारपूस केली. मात्र, चारशे रुपयांची चिरीमिरी घेऊन हे दोघे पोलीस तिथून निघून गेले, असा त्यांच्यावर आरोप होता.

सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात दोषी दोघांवर ही कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.