पुणे,दि.1- रो हाऊस बांधून देण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची 32 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रकाश मॅमन जॉर्ज(63,रा.घाटकोपर) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार बाबाजी बाबुराव जाधव(रा.सदगुरु बंगला, धनकवडी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी प्रकाश जॉर्ज यांना कात्रज येथील गायत्री बिल्डींग येथे रो हाऊन बांधून देतो असे सांगितले होते. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 32 लाख रुपये घेण्यात आले. ही रक्कम जानेवारी 2011 पासून घेण्यात आली होती. मात्र आजवर त्यांना रो हाऊस बांधून देण्यात आले नाही. फिर्यादीची फसवणूक करुन रकमेचा अपहार केला. याप्रकरणी फिर्यादीने तक्रार अर्ज दिला होता, त्याचा तपास करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.