सोनई, (प्रतिनिधी) – सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी सोनई या महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2023- 24 या वर्षामध्ये डी.फार्मसी, बी.फार्मसी व एम.फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे.
यामध्ये अश्विनी वाघ, निकिता गायके यांची गिब्ज हेल्थकेअर प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर तसेच चेतन धाकतोडे याची युनिकेम लॅबरोटरीज गोवा व अजय दातीर आणि ओंकार माळवदे यांची सँडोज प्रा. लि. मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी निवड झाली.
सोनईसारख्या ग्रामीण भागात फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीचे संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाविद्यालयात दरवर्षी नामांकित औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे इंटरव्यू आयोजित केले जात असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी दिली.
तसेच एनबीए मानांकन प्राप्त असलेल्या या महाविद्यालयास सुसज्ज इमारत, अद्यावत प्रयोगशाळा, आधुनिक उपकरणे, भव्य ग्रंथालय यासारख्या सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व मुळा एज्युकेशन व्यवस्थापन सदैव प्रयत्नशील असल्याचे प्राचार्य डॉ. विनायक देशमुख यांनी सांगितले.