बांगलादेश संघाचा भारत दौरा संकटात

नवी दिल्ली: बांगलादेश संघाचा आगामी भारत दौरा संकटात सापडला आहे. खेळाडूंचे मानधन बांगलादेश क्रिकेट मंडळाने अद्याप केले नसुन गेल्या मोसमापासून खेळाडुंनी याबाबत सातत्याने केलेल्या मागणीकडे मंडळाने सातत्याने कानाडोळा केला आहे.

अखेर खेळाडूंच्या वतीने वरिष्ठ खेळाडु शकिब अल हसन, मंहमदुल्ला व मुशफिकुर रहिम यांनी एका पत्रकार परिषदेत मंडळाच्या समोर आपल्या 11 मागण्या ठेवल्या आहेत.

या मागण्या पूर्ण झाल्यावरच भारत दौऱ्याबाबत सकारात्मक विचार करु असे या खेळाडूंनी व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर खेळाडूंच्या मागण्या आमच्यापर्यंत आल्या की यावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.