पक्षीय राजकारणात शेतकऱ्यांचा बळी नको

भवानीनगर – राज्य शाससनाने नीरा डावा कालव्याच्या पाण्याबाबतचे धोरण हे पूर्व नियोजित पाहिजे होते. नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याबाबतीत हेच जर अगोदर सरकारने वर्षभराचे पाण्याचे नियोजन केले असते तर शेतकऱ्यांनी शेतातील उपलब्ध पाणीसाठा किती आहे, याचा विचार करून पिके घेतली असती, अशी प्रतिक्रिया श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.

काटे म्हणाले की, सध्या शासनाने बारामतीला येणाऱ्या नीरा डाव्या कालव्याच्या पाणी कपातीबाबतीत घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसावर परिणाम होणार आहे. ऊस गाळपासाठी कमी प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने अजूनही अडचणी निर्माण होणार आहेत. शासनाने केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांचा बळी देऊ नये, असे धोरण आखायला पाहिजे होते. पक्षीय राजकारणात विनाकारण सामान्य शेतकऱ्यांचा जीव पाण्यावाचून जाणार आहे, याचा विचार शासनाने करण्याची गरज आहे. शासनाने सूडबुद्धीचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्याचा विचार करावा. राज्य शासनाने यापूर्वी पूर्वनियोजन केले असते तर शेतकऱ्यांनी ऊस लागवडी कमी केल्या असत्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.