चाकण उद्योगपंढरीत गुंडाराज

महाळुंगे इंगळे -प्रचंड वेगाने विस्तारत चाललेल्या चाकण उद्योग पंढरीत स्थानिकांसह परप्रांतीयांनी केलेले आक्रमण, त्यातून फोफावलेली गुन्हेगारी, वाढती गुंडगिरी, दरोडे, खून, हत्या, बलात्कार, विनयभंग, ठेके मिळविण्या बरोबर अवैध धंद्यात सुरू असेलेली चढाओढ आणि दहशत आदींमुळे उद्योगपंढरी दहशतीखाली आहे. कामगारांसह कारखानदार व कंपनी मालकांच्या होणाऱ्या हत्या, खून ही आता चिंताजनक बाब होवू लागली आहे. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीत कंपनीचे मालक, चालक, पार्टनर कारखानदार आदींची सुरक्षाही “रामभरोसे’ झाल्याचे खुना सारख्या अन्यप्रकारांनी अधोरेखित होवू लागले आहे.

आशिया खंडानंतर औद्योगिकी करणाच्या बाबतीत चाकणचे नाव पहिल्यांदा प्राधान्याने घेतले जाते. 1984 मध्ये चाकण औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली. त्यानंतर चाकण व पंचक्रोशीत राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जागतिक स्तरावरील कंपन्यांचे मोठे जाळे तयार झाले. कारखानदार व मालक यांनी आज या भागात आपले ठाण मांडून मोठे वर्चस्व निर्माण केले आहे. उद्योगांच्या माध्यमातून स्थानिकांसह जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील आणि राज्य व राज्याबाहेरील परप्रांतीय कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला, ही आजची वस्तुस्थिती आहे. दिवसेंदिवस जस जशी चाकण औद्योगिक वसाहत नावारूपास येवू लागली, तसतसे या भागात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे.

चाकण भागात एकूण 700 पेक्षा अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या, वर्कशॉप व कारखाने आहेत. त्याच तुलनेत कामगारांची संख्याही तितकीच मोठी आहे. आपल्या चेलेचपाट्याच्या माध्यमातून त्या कंपन्यांमध्ये ठेके मिळविण्यासाठी व आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा, संघर्ष वाढू लागले आहेत. त्यातून खुनासारखे गंभीर प्रकार घडत आहेत. त्यातून अनेकांचे नाहक बळी जावू लागल्याने चिंता व्यक्‍त केली जात आहे. कंपनीत काम मिळविण्यासाठी कामगार ठेकेदारांना, तर कंपनीत ठेका मिळविण्यासाठी ठेकेदार मालकांना (पान 3 पहा)8

एकापेक्षा एक घटनांनी ढवळले
खून, हल्ल्यासारख्या प्रकारांनी नेहमी चर्चेत असेलला चाकण परिसर एकापेक्षा एक घटनांनी ढवळून निघाला आहे. वाढती गुन्हेगारी, अल्पवधीत फोफावलेली गुंडगिरी, दहशत, ठेकेदारीसह अवैध धंद्यांमध्ये सुरू असलेली चढाओढ आणि प्रत्यक्षात खुनासारख्या घटनांमध्ये थेट रिक्षाचालकांचा समावेश असल्याने औद्योगिक वसाहत पुरती हादरून गेली आहे. जिल्ह्यात प्रथमच चाकणमध्ये चक्‍क कंपनी मालकाचा त्याच्या स्वत:च्या मालकीच्या कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर दगडाने ठेचून अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आल्याने नागरिकांसह या भागातील कारखानदार व कंपनी चालकांनी चिंता व्यक्‍त केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.