मुंबई :पुढील तीन दिवस सलग सुट्ट्यांमुळे बॅंका बंद राहणार आहेत. यामुळे याचा फटका बॅंकेच्या संबंधित काम करणाऱ्या ग्राहकांना बसू शकतो. उद्या (21 फेब्रुवारी) ते रविवार (23 फेब्रुवारी) पर्यंत अशा तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत.
बॅंक उद्या महाशिवरात्री असल्यामुळे बॅंकांना सुट्टी आहे.
तर शनिवारी (22 फेब्रुवारी) महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बॅंका बंद राहणार आहेत. यानंतर रविवारी बॅंकेला सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व बॅंका उद्यापासून तीन दिवस बंद असणार आहेत. या तीन दिवसांच्या सुट्टीमुळे चेक क्लियरेन्स, अकाऊंट ओपनिंग इतर कामे बंद राहणार आहेत.