जातेगाव फाट्याजवळ उभ्या ट्रकला दिली धडक
नगर/सुपा – नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ (पळवे शिवारात) उभ्या असलेल्या ट्रकवर स्कार्पिओ गाडी आदळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज पहाटे (मंगळवार) हा अपघात झाला.
ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय-30 रा. फिरदोस नगर, धुळे) फैसल गुलाब रब्बाली अन्सारी (वय-20), इरफान शयशोदोहा अन्सारी (वय-20. दोघे रा. मछली बाजार, धुळे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अदनान निहाल अन्सारी (वय-21 रा. तिरंगा चौक, धुळे) हा जखमी झाला आहे. पुण्याहुन नगरकडे जात असतांना जातेगाव फाट्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रकवर पाठीमागून आलेल्या स्कार्पिओने जोराची धडक दिली. पहाटेच्या झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात.