पावसाने कोसळली कंपनीची सीमाभिंत

चिंचवड येथील प्रकार : सुदैवाने जीवितहानी टळली

चिंचवड – चिंचवड परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या एका कंपनीची भिंत संततधार पावसामुळे कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गणेशनगर येथे गेली अनेक वर्षे ताडपत्री बनविण्याची कंपनी होती. कंपनी बंद पडल्यामुळे येथील यंत्रसामुग्री इतरत्र मालकाने हलवली. परंतु, कंपनीच्या देखभालीसाठी याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात आहेत. संततधार पावसामुळे आज कंपनीच्या परिसरातील दोन ठिकाणी सीमाभिंत कोसळली आहे. सुमारे 400 ते 500 फूट लांबीची व आठ फूट उंचीची सीमाभिंत अनेक ठिकाणी कमकुवत होऊन रस्त्याच्या बाजूने ढासळली आहे. कोसळलेल्या सीमाभिंतीमुळे सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कंपनीच्या सीमाभिंतीलगतच डांबरी रस्ता आहे. या परिसरात शाळेची मुले आपल्या पाल्यांसह नियमित ये-जा करत असतात. सुदर्शननगर, गोलांडे इस्टेट आदी परीसरात सुमारे 500 हून अधिक फ्लॅटधारक वास्तव्यास आहेत. चिंचवड रेल्वे स्थानक, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशनकडे जाणारे-येणारे दुचाकी, चारचाकी, शाळेची स्कूलबस, पादचारी महिला, मुले या सीमाभिंतीलगतच्या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यावर भिंत कोसळ्याने रहदारीला अडथळा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)