‘निर्भय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ओदिशा –  भारताने आज स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली असून या क्षेपणास्त्राचा टप्पा १ हजार किलोमीटर पर्यंतचा  आहे. ओदिशाच्या किनारपट्टीवरून आज या सब-सोनिक क्रूझ मिसाइलची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे आगामी काळात भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये मोठी वाढ होणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)