मला 55 टक्केचं मते दिली, पाणीही तेवढेच मिळणार ; भाजप नेत्यांची धमकी

बडोदा: राजकीय नेते निवडणुकीत जिंकण्यासाठी काहीही करतात. गुजरातमधील भाजपच्या नेत्यांनी थेट महिलांना पाणी कपात करण्याची धमकी दिली आहे. पाण्याची टंचाई असल्यामुळे काही महिलांनी भाजपाचे पाणी पुरवठा मंत्री कुंवरजी बावलिया यांच्याकडे तक्रार केली. यावर मंत्र्याने मला तुम्ही 55 टक्केच मते दिली, पाणी तेवढेच मिळणार, अशी धमकी दिली.

कुंवरजी बावलिया हे त्यांच्या मतदारसंघात फिरत असताना तेथील महिलांनी आपल्याला पाणी मिळत नसल्याची तक्रार केली. यावर मला विधानसभेसाठी विनंती करूनही 55 टक्केच मते दिलीत, असे प्रत्यूत्तर दिले. यावर भाजपाचे माजी आमदार भरत बोघारा यांनी पुढे बोलत ‘आता तुम्हाला तेवढेच पाणी मिळेल’, अशी धमकी दिली.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला निसटता विजय तेथील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी आला आहे. पाटीदार आंदोलन आणि अन्य प्रश्नांवर कांग्रेसने चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे दादागिरी आणि धमकी देण्याचे प्रकार घडत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.