संजय दत्त सुरू करणार नवी इंनिग….

मुंबई – बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच अभिनेता संजय दत्त आता बॉलिवूडमध्ये नवी इंनिग सुरू करणार आहे. संजय दत्त लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय, खुद्द संजय दत्तने याबाबत खुलासा केला आहे. येत्या 17 एप्रिलला संजय दत्तचा ‘कलंक’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अनेक चित्रपट त्याचे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. यामध्ये पानीपत, प्रस्थानम आणि शमशेरा या चित्रपटांचा समावेश आहे.

सजंय दत्त लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून संजय आणि त्याच्या टीमने यावर काम करण्यास देखील सुरूवात केली आहे. संजय दत्त हा स्वतच्या प्रॉडक्शन हाऊसमध्येच या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

संजय दत्तने या चित्रपटाच्या कथेबाबत देखील खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, हा चित्रपट माझ्या पूर्वजांवर आधारित असेल. हा एक ऐतिहासिक चित्रपट असेल. यात मी माझे पूर्वज मोहयल यांना पडद्यावर दाखवणार असून ते हुसैनी क्षत्रिय ब्राह्मण होते. पैगंबरच्या नातवाला साथ देत त्यांनी युद्ध लढले होते. यात मी राहिब सीन दत्तची भूमिका साकारणार आहे. जो मोहयल्सचा सर्वेसर्वा होता. लवकरच या चित्रपटाची घोषणा होणार,असून यावर सध्या काम चालू असल्याचे त्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.