पुणे – हवाई दलाच्या लढाऊ विमाने रडारच्या धोक्यांपासून दूर ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) प्रगत “चाफ’ तंत्रज्ञान आणि “चाफ’ काडतूस -118/आय विकसित केले आहे. डीआरडीओच्या जोधपूर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुण्यातील उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (एचईएमआरएल) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
अलीकडील काळात इलेक्ट्रॉनिक युद्धात आधुनिक रडारनिर्मितीत झालेल्या प्रगतीमुळे लढाऊ विमानांना समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विमानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, काउंटर मेजर डिस्पेंसिंग सिस्टीम (सीएमडीस) वापरली जाणारी ही यंत्रणा इन्फ्रा-रेड आणि रडारच्या धोक्यांना निष्क्रिय करत, सुरक्षा प्रदान करते. लढाऊ विमानांसाठी “चाफ’ हे एक महत्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञान आहे, जे लढाऊ विमानांचे प्रतिकूल रडारच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. सद्यस्थितीत अतिशय कमी “चाफ’ तंत्रज्ञान हे हवेत तैनात असलेल्या लढाऊ विमानांना सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम ठरतात.
भारतीय हवाई दलातर्फे या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हवाई दलात याचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.