बॉटल कॅप चॅलेंजच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर सलमान खान ट्रोल

सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’च्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. हेच चॅलेंज स्वीकारत सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. परंतु त्याच्या चॅलेंजला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. कोणतेही लहान मोठे आव्हान स्वीकारण्यासाठी प्रत्येक जण सर्वात आधी देवाला नमन करतात. या व्हिडिओमध्येही सलमान असंच काही करताना दिसत असून हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन पद्धतीत नमस्कार करताना दिसतो. याच कृतीमुळे त्याला चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

 

View this post on Instagram

 

Don’t thakao paani bachao

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on Jul 14, 2019 at 5:33am PDT

वेगवेगळ्या पद्धतीत नमस्कार केल्यामुळे नेटकऱ्यांनी ‘तू मुस्लिमच आहेस ना?’, असा प्रश्न विचारला आहे. तर, कोणी त्याची खिल्लीही उडवली. ‘बॉटल कॅप चॅलेंज’चा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये सलमानने पाणी जपूण वापरण्याचा संदेशही दिला आहे. पण, त्याचा हा संदेश ऐकण्या आणि वाचण्याला प्राधान्य न देता नेटकऱ्यांनी मात्र धर्माचं कारण पुढे करत सलमानला धारेवर धरले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)