भारतीयांचे प्राधान्य मुलांच्या शिक्षणासाठीच्या गुंतवणुकीला!

भारतीय गुंतवणूकदार आपल्या भावी पिढीला घडवण्यासाठी, त्यांना गुणवत्तापूर्ण, चांगले शिक्षण मिळण्यासाठी व त्यादृष्टीने योग्य शिक्षण संस्था व त्यातील योग्य अभ्यासक्रम याची निवड करणे व त्यासाठी लागणारे मोठ्या शुल्काची व्यवस्था करणे या प्रमुख उद्दीष्टासाठी प्रत्येक पालक कायम विचार करत असतात, असे एका पाहणीतून दिसून आले आहे.

बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, भारतीय गुंतवणूकदार त्यांच्या भविष्याबाबत विचार करताना सर्वात जास्त महत्त्व मुलांच्या शिक्षणाला देतात.  त्यासाठी  प्रत्येक पालक उत्पन्नातील मोठी बचत विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये करत असतात. मात्र ही गुंतवणूक करत असताना उद्दीष्टासाठी तुलनेत खूपच कमी जोखिम स्वीकारत असतात त्यामागे त्यांची आर्थिक आणि गुंतवणूकविषयक साक्षरता कमी असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे –

बहुतांश भारतीय गुंतवणूक करताना जोखिम घेण्याचे टाळतात आणि याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक साक्षरतेचा अभाव. त्यांची गटवारी

गट क्रमांक १ – जोखिम घेण्याची क्षमता कमी, गुंतवणुकीचे ज्ञान कमी

(सॅम्पल साईझ ४२७, एकूण सर्वेक्षणाच्या २६ टक्के)

४२७ पैकी ३४ टक्के गुंतवणूकदारांचे प्राधान्य मुलांचे शिक्षण

२७ टक्के गुंतवणूकदारांचे प्राधान्य शांततामय जीवन

२७ टक्के गुंतवणूकदारांचे प्राधान्य स्वतःचे घर

२३ टक्के कुटुंबासमवेत चांगल्या प्रकारे वेळ घालवणे

१८ टक्के व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न

(एकाच वेळी एकापेक्षा जास्त गोष्टींना प्राधान्य असल्याने आकडेवारी शंभर टक्क्यांच्या पुढे जाते.)

गट क्रमांक २ – जोखिम घेण्याची क्षमता मध्यम स्वरुपाची, गुंतवणुकीचे ज्ञान कमी

(सॅम्पल साईझ – ५५७ (एकूण सर्वेक्षणाच्या ३३ टक्के)

३५ टक्के गुंतवणूकदारांचे प्राधान्य मुलांचे शिक्षण

३१ टक्के स्वतःचे घर

३१ टक्के शांततामय जीवन

२५ टक्के कुटुंबासमवेत चांगल्या प्रकारे वेळ घालवणे

२४ टक्के व्यवसायात वृद्धीला प्राधान्य

 

गट क्रमांक ३ –जास्त जोखिम घेण्याची क्षमता, गुंतवणुकीचे ज्ञान कमी

सॅम्पल साईज ३९ (एकूण सर्वेक्षणाच्या फक्त २ टक्के)

३८ टक्के प्राधान्य मुलांचे शिक्षण

३८ टक्के प्राधान्य शांततामय जीवन

३१ टक्के प्राधान्य स्वतःचा व्यवसाय वाढवणे

२१ टक्के प्राधान्य स्वतःचे घर

२१ टक्के प्राधान्य इतर व्यक्तींना नोकरी देण्याचा प्रयत्न

गट क्रमांक ४ – जोखिम घेण्याची क्षमता कमी, गुंतवणुकीचे ज्ञान जास्त

सॅम्पल साईज १८४ (एकूण सर्वेक्षणाच्या ११ टक्के)

२५ टक्के गुंतवणूकदारांचे प्राधान्य मुलांचे शिक्षण

२४ टक्के प्राधान्य शांततामय जीवन

२४ टक्के प्राधान्य स्वतःच्या व्यवसायाच वृद्धी

२४ टक्के प्राधान्य स्वतःचे घर

२० टक्के प्राधान्य परदेशी जाण्याचे स्वप्न

गट क्रमांक ५ – मध्यम स्वरुपाची जोखिम घेण्याची क्षमता, गुंतवणूक ज्ञान जास्त

सॅम्पल साईज – ४२० (एकूण सर्वेक्षणातील २५ टक्के )

३७ टक्के गुंतवणूकदारांचे प्राधान्य मुलांचे शिक्षण

२९ टक्के प्राधान्य स्वतःच्या व्यवसायात वृद्धी

२९ टक्के प्राधान्य शांततामय जीवन

२५ टक्के प्राधान्य स्वतःचे घर

२५ टक्के प्राधान्य कुटुंबासोबत वेळ घालवणे

गट क्रमांक ६ – जास्त जोखिम घेण्याची क्षमता, गुंतवणकीचे ज्ञान जास्त

सॅम्पल साईज ५४ (एकूण सर्वेक्षणातील ३ टक्के )

३९ टक्के गुंतवणूकदारांचे प्राधान्य मुलांचे शिक्षण

२८ टक्के प्राधान्य शारिरिक व मानसिक स्वास्थ उत्तम ठेवणे

२२ टक्के प्राधान्य शांततामय जीवन

२२ टक्के प्राधान्य स्वतःचे घर

२२ टक्के प्राधान्य घराचे नूतनीकरण किंवा घराची पुनर्बांधणी

Leave A Reply

Your email address will not be published.