मी अजूनही तरूणच – रॉजर फेडरर

File photo......

पॅरिस – व्याबसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पंण आज वीस वर्षे झाली तरी माझा उत्साह तरूण खेळाडूंसारखाच आहे. त्याचे श्रेय मला चिरतरूण ठेवणाऱ्या देवास व माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांना मी देईन असे अव्वल दर्जाचा खेळाडू रॉजर फेडरर याने सांगितले. त्याने नुकत्याच झालेल्या हॅले खुल्या स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळवित विम्बल्डनच्या विजेतेपदासाठी दावेदार असल्याची झलक दिली आहे.

विम्बल्डन स्पर्धेच्या मुख्य फेरीस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. फेडरर याने आतापर्यंत या स्पर्धेत आठ वेळा अजिंक्‍यपद पटकाविले आहे. त्याखेरीज त्याने सहा वेळा ऑस्ट्रेलियन खुली, एकदा फ्रेंच खुली व पाच वेळा अमेरिकन खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे.

फेडरर म्हणाला की, विम्बल्डन ही माझी अत्यंत आवडती स्पर्धा आहे. येथे मला सर्वाधिक विजेतेपद मिळाली आहेत. पण त्याचबरोबर येथील चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात. विम्बल्डन स्पर्धा ही जगातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा असते. येथील मुख्य फेरीत भाग घेण्याची संधी मिळणेही भाग्याची कामगिरी मानली जाते. वीस वर्षांपूर्वी येथे मी पहिल्यांदा खेळलो होतो, त्यावेळी माझ्यावर खूप दडपण होते. हळुहळु मला येथील ग्रासकोर्ट व चाहत्यांची सवय झाली. आता येथील कोर्टवर पराभव मला कधी आवडत नाही. त्यामुळेच येथे विजेता होण्यासाठी मी खूप मेहनत घेत असतो. जेव्हां जेव्हां मी हॅले स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे, त्या प्रत्येक वेळी विम्बल्डनमध्येही माझी कामगिरी अव्वल झाली आहे. यंदाही मी अशीच अपेक्षा करीत आहे.

फेडरर याला गतवर्षी विम्बल्डनमधील उपांत्यपूर्व फेरीत केविन अँडरसन याच्याकडून रोमहर्षक लढतीनंतर पराभूत व्हावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)