उत्तर कोरियाने पॉम्पेओ यांच्यावर फोडले खापर

सेऊल – अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ हेच अण्विक तडजोडीच्या चर्चेत बाधा आणत आहेत त्यांच्यामुळेच अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील ही चर्चा पुढे सरकू शकलेली नाही असा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्यात दोन वेळा थेट चर्चा झाली आहे. पण दुसऱ्या फेरीनंतर दोन्ही देशांमधील ही चर्चेची प्रक्रिया ठप्प झाली आहे त्याला पॉम्पेओ हेच जबाबदार असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. त्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करून या प्रक्रियेत अडथळे आणले आहेत असा आरोप आज उत्तर कोरियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने त्यांचे नाव घेऊन केला.

अमेरिका आणि जगातल्या अन्य देशांनी उत्तर कोरियावर त्यांच्या वादग्रस्त अण्विक कार्यक्रमामुळे जे निर्बंध घातले आहेत त्यामुळे त्यांच्या 80 टक्के अर्थकारणाला बाधा आली असून हा देश यामुळे बेजार झाला आहे. स्वता पॉम्पेओ यांनीच हे विधान केले आहे. आता त्यांना हे प्रमाण शंभर टक्‍क्‍यांपर्यंत वाढवायचे आहे काय असा सवाल उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अशाने कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्र मुक्त करण्याच्याही प्रयत्नांना बाधा येत आहे असेही या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.